चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य सवतसडा धबधबा.
चिपळूण शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर तर रेल्वे स्टेशनपासून फक्त १ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेला हा धबधबा आहे.

२०० मीटर उंचीवरुन कोसळणाऱ्या या जलधारा पाहताना श्री रामदास स्वामींच्या ओळी आठवतात

गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे
धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे ||

जुलै ते ऑक्टोबर याकाळात धबधब्याला भरपूर पाणी असते. सवतसड्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. या कोरोनाकाळात सोशल डिस्टंन्शिंग व स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यासाठी प्रशासनाने पाऊलवाटहि केली आहे.

असा हा निसर्गरम्य सवतसडा पाहायला येणार असाल तर जवळच असलेले श्री क्षेत्र परशुराम, गोवळकोटचा गोविंदगड आणि श्री देवी करंजेश्वरीचे आशिर्वाद घ्यायला विसरू नका !